8 December 2021 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Man Infraconstruction Ltd | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील या स्मॉलकॅप स्टॉकने 300 टक्के रिटर्न दिला | वाचा सविस्तर Gen Bipin Rawat Chopper Crash | हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू Mastek Ltd | आशिष कचोलियांच्या पोर्टफोलिओतील हा मल्टीबॅगर स्टॉक नवीन ब्रेकआउटसाठी तयार | तुमच्याकडे आहे? Indo Count Industries Ltd | या स्टॉकमध्ये 1 वर्षात 40 टक्के रिटर्नची संधी | ICICI ब्रोकरेजचा खरेदी कॉल Closing Bell | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी | निफ्टीही प्रचंड वाढला India GDP Fitch Forecast | फिच रेटिंगने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला Bharti Airtel Ltd | या स्टॉकमध्ये 22 टक्के रिटर्नचे संकेत | ब्रोकरेजचा खरेदीचा कॉल
x

Arvind Trivedi Passes Away | रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

Arvind Trivedi Passes Away

मुंबई, ०६ ऑक्टोबर | टीव्ही जगतातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन (Arvind Trivedi Passes Away) झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारली होती.

Arvind Trivedi Passes Away. who played the role of Ravana in the popular TV serial ‘Ramayana’, has passed away. He was 82 years old. Trivedi had played the role of Ravana in Ramanand Sagar’s ‘Ramayana’ :

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, काल ​​रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

रामायण मालिकेमध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम आणि वेताळ’मध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेदेखील गुजराती सिनेमांतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतून अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Arvind Trivedi Passes Away at age of 82.

हॅशटॅग्स

#Ramayana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x