मुंबई : दहीहंडी दरम्यान महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांच्याविरोधात स्युमोटो दाखल करून घेतल्यानंतर त्यांना ८ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

त्याआधी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्त्रियांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होत. परंतु आता त्यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून घेत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना राम कदमांच्या जिभेवरील ताबा घसरला आणि उपस्थित तरुणांना उद्देशून म्हणाले होते की, ‘एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने तुम्हाला नकार दिला. तर त्या मुलाने आपल्या आई वडिलांना आणावे, आई वडिलांनी जर सांगितले की आम्हाला मुलगी पसंत आहे तर मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. १०० टक्के मी मदत करेन हा शब्द देतो’ असं बेताल वक्तव्य केलं होत.

त्यानंतर मात्र त्यांच्यावर सर्वच थरातून तुफान टीका करण्यात येत आहे. अनेक पक्ष तसेच समाजसेवी संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला होता. अनेक वृत्त वाहिन्यांनीसुद्धा त्यांना चांगलेच धारेवर धरले असले तरी ते जाहीर माफी न मागता केवळ वरवरची दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून घेतली.

maharashtra state commission for women has registered a suemoto against BJP MLA Ram Kadam on controversial statement against womens