5 August 2021 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट

Opposition Leader Devendra Fadnavis, Eknath Khadse

जळगाव : भारतीय जनता पक्षामधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली.

मात्र या चर्चेदरम्यान खडसे यांनी आपल्या नाराजीबद्दल मौन बाळगले आहे. देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी जळगावात आले होते. माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही असं खडसे यांनी सांगितलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही’ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर आपल्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली होती. त्याच सभेत माझा काही भरवसा नाही मी कधीही पक्ष सोडू शकतो असंही खडसे म्हटले होते. एवढी सगळी नाराजी समोर आलेली असताना खडसे आणि फडणवीस भेट महत्त्वाची मानली जाते आहे. गिरीश महाजन यांनीही भारतीय जनता पक्षात सारंकाही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadanvis and Eknath Khadse meeting at Jalgaon.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x