21 March 2023 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HCL Technologies Share Price | ही आयटी कंपनी गुंतवणुकदारांना 2100 टक्के डिव्हीडंड देणार, रेकॉर्ड डेट नुसार फायदा घ्या Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला? Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
x

Maharashtra HSC Result 2021 | राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के | इथे ऑनलाईन पहा

Maharashtra HSC Result 2021

मुंबई, ०३ ऑगस्ट | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. HSC बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सरासरी निकालांची टक्केवारी जारी केली. त्यानुसार, बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. अर्थातच एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना आपले निकाल सायंकाळी 4 वाजल्यापासून https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org यासोबतच mahresult.nic.in इत्यादी संकेतस्थळांवर पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी हा निकाल जाहीर केला. कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला परीक्षा लांबवण्यात आल्या. त्यानंतर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निकाल कसा लावला जाणार यासाठी बोर्डाकडून एक सूत्र ठरवण्यात आले. त्यानुसारच, मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या विषयानुसार, 4 वाजता निकाल पाहता येतील असे बोर्डाने आधीच जाहीर केले आहे.

कोणत्या शाखेचा निकाल किती?
* विज्ञान – 99.45 टक्के,
* कला – 99.83 टक्के,
* वाणिज्य 99.81 टक्के,

एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

किती विद्यार्थ्यांना किती गुण?
* 12 विद्यार्थ्यांना- 35 टक्के
* 91, 435 विद्यार्थ्यांना- 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण
* 1372 विद्यार्थ्यांना- 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण
* 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?
स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा
स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा
स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra HSC Result 2021 declared online news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x