5 August 2021 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

भाजपाला इंदापूरात जोरदार धक्का | हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Indapur Prashantrao Patil

पुणे, १६ जुलै | राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी ( दि.१६ जुलै ) प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, दत्तात्रय घोगरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, युवा उद्योजक रणजित घोगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील, कुलदीप पाटील यांनी प्रवेश केला.

असा होणार परिणाम?
प्रशांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राहत्या बावडा गावात व बावडा – लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात, तसेच इंदापूर तालुक्यात राजकीय प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदाच बावडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या पाटील घराण्यात जनाधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना तसेच इतर संस्थांमध्येेेे व पंचायत समितीमध्ये पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेेे काम केले आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Indapur taluka Prashantrao Patil joins NCP in presence of DCM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(655)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x