28 May 2022 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 वर्षात 10 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 23 लाख रुपये केले Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
x

साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे कान टोचले.

बडोदा : बडोद्यात भरलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे कान टोचले. ”राजा तु कुठेतरी चुकतो आहेस, त्यात सुधारणा झाली पाहिजे,”अशा शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे कान टोचले.

पुढे संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख असेही म्हणाले की सरकार कुठेतरी चुकत आहे आणि सरकारने त्यांच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष सयाजीराव महाराजांची आठवण काढताना म्हणाले की प्रत्येक धर्माने स्वतःमध्ये काळानरूप बदल केला पाहिजे ही सयाजीराव महाराजांनी सांगितलेली गोष्ट फार महत्वाची आहे आणि ते प्रत्येकाने लक्ष्यात घेतले पाहिजे.

बडोद्यात भरलेल्या या ९१ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बडोदा संस्थानाच्या राजमाता शुभांगीराजे यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं.

हॅशटॅग्स

#Baroda Sahitya Sammelan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x