24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

पीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.

मुंबई : पीएनबी बँकेच्या ११,३०० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पहिली अटक केली आहे. पीएनबी बँकेचा ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला आणि आणखी दोघा संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

पीएनबी बँकेचा ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याच्या सहित सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी च्या कंपनीचा अधिकृत स्वाक्षरीदार हेमंत भट याला सुध्दा सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यांना सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार असून लवकरच या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे पीएनबी बँकेच्या ११,३०० कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी हवा असलेला प्रमुख आरोपी नीरव मोदी अमेरिका, बेल्जियम किंवा स्वित्झर्लंडला गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

धक्कादायक माहिती;

दुसरीकडे हे ही समोर येत आहे की, एनडीएच्या काळात ५,००० कोटींचा घोटाळा झाला आहे म्हणजे निरव मोदीला सर्वाधिक एलओयू 2017 मध्ये जारी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

पीएनबी बँकेतील ११,३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सीबीआयच्या एफ.आय.आर मध्ये एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ती म्हणजे घोटाळ्यातील एकूण ११,३०० कोटी पैकी ५,००० कोटी रुपयांच्या घोटाळा हा एनडीए (भाजप प्रणित) म्हणजे नरेंद्र मोदींच्या काळात झाला असल्याचे असल्याचे पुढे आले आहे.

कारण नीरव मोदीला सर्वाधिक एलओयू 2017 मध्ये जारी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. म्हणजे अटक झालेला आरोपी गोकुळनाथ शेट्टी याने त्याच्या निवृत्तीच्या कार्यकाळापर्यंत नीरव मोदीला हमीपत्र आधीच जारी करून ठेवले होते. एलओयूमध्ये आणखी अनेक बँकेची नावे समोर येत असून त्यांच्याच हाँगकाँग, फ्रँकफर्ट, बहारीन आणि मॉरिशस ब्रांचने मुख्य सूत्रदार निरव मोदीसाठी रक्कम दिली.

हॅशटॅग्स

#Chota Modi(1)#NDA(5)#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x