27 July 2024 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस कंपनीबाबत नवीन अपडेट, स्टॉक प्राईस नव्या उंचीवर जाणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीला आयकर विभाग 6329 कोटी रुपये कर परतावा देणार आहे. दरम्यान ही बातमी येताच इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1,528 रुपये किमतीवर पोहचले होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 1,731 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( इन्फोसिस कंपनी अंश )

ब्रोकरेज फॉर्म BNP पारिबसने इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सवर 2000 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 1,487.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इन्फोसिस कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीला आयकर विभागाकडून 6329 कोटी रुपये आयकर परतावा मिळणार आहे. हा परतावा 2007-08 ते 2018-19 या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणार आहे. तथापि आर्थिक वर्ष 2016-17 साठी कंपनीला कोणताही परतावा मिळणार नाही. आयकर विभागाने इन्फोसिस कंपनीला आर्थिक वर्ष 2022-23 साठी 2763 कोटी रुपयेची नोटीस बजावली होती. यासह आर्थिक वर्ष 2011-12 साठी कंपनीला व्याजासह 4 कोटी रुपये मूल्याचा टॅक्स डिमांड ऑर्डर देखील मिळाला आहे.

इन्फोसिस कंपनी 18 एप्रिल 2024 रोजी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. इन्कम टॅक्स रिफंडचा परिणाम कंपनीच्या मार्च 2023 तिमाही निकालांवर देखील पाहायला मिळणार आहे. याशिवाय इन्फोसिस कंपनीला आपल्या उपकंपन्यासाठी 277 कोटी असेसमेंट ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.

31 डिसेंबर 2023 पर्यंत इन्फोसिस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 14.78 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने कंपनीचे 33.7 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. DII ने इन्फोसिस कंपनीचे 35.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 39610 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकलनात 1.34 टक्के वाढ झाली होती. डिसेंबर 2023 तिमाही इन्फोसिस कंपनीने 6113.00 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE 02 April 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x