28 June 2022 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा
x

ईडी कारवायांमध्ये अडकलेल्या नेत्यांसोबत भाजपची मतांसाठी सेटलमेंट | भाजपाचा चेहरा उघड होतोय?

Maharashtra Vidhan Parishad Election 2022

Maharashtra Vidhan Parishad Election | राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मताची जुळवाजुळव सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच विधान परिषद निवडणुकीवरुन विरोधकांवरती गंभीर आरोप केले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर :
विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. आमच्या आमदारांना धमकावले जात आहे. महाविकास आघाडीतील आमदारा फोन करुन धमकावले जात आहे, त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे ती योग्यवेळी बाहेर काढू असे नाना पटोले म्हणाले आहेत.

लहान पक्षांच्या नेत्यांचीही मनधरणी :
अपक्ष आमदारांसह लहान पक्षांच्या नेत्यांचीही मनधरणी सुरु आहे. याच प्रयत्नात आज भाजप नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे हितेंद्र ठाकुरांच्या भेटीसाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे लोकल मधून गेले. वेळेची बचत करण्यासाठी लोकलने प्रवास केल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं.

मत भाजपकडे गेल्याचा आरोप :
राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी कुणाला मतदान करणारे, हे गुलदस्त्यात ठेवलं होतं. महाविकास आघाडीनं एवढी मनधरणी केल्यानंतरही त्यांचं मत भाजपकडे गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या तीन आमदारांची मते कुणाला पडतात, यासाठी पक्षांची रस्सीखेच सुरु आहे.

सर्वच पक्षाचे नेते आ. हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला :
काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 10 मते कमी पडत आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच भाजप आमदार मनीषा चौधरी यांनीही ठाकूर यांची बुधवारी भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांनीही ठाकूरांची भेट घेतली. दरम्यान, विविध राजकीय कामांसाठी या भेटी असल्याचं हितेंद्र ठाकुरांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Vidhan Parishad Election 2022 check latest updates 18 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x