13 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

धारावीत कोरोना पसरतोय; २४ तासांत ४४ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Covid 19, Mumbai Dharavi

मुंबई, १८ मे: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

रविवारी आढळून आलेले नवे रुग्ण मुस्लिमनगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरानगर, लक्ष्मी चाळ, महात्मा गांधीनगर, न्यू पारसी चाळ, जनता सोसायटी, कल्याणवाडी, शाहुनगर, जास्मिन मिल रोड, गुलमोहर चाळ, ढोरवाडा, सर्वोदय सोसायटी, सोशलनगर, मुकुंदनगर, काळा किल्ला, कुंचीकोरवेनगर, ६० फुटी रस्ता, या परिसरातील असल्याचे समजते आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. परंतु, गेली दोन महिने कोरोनापासून दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील ३ लोकांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९६ हजारांच्या वर गेली आहेत. २४ तासांत कोरोनाचे ५ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, देशात आता एकूण रुग्णांची संख्या ९६ हजार १९६ झाली आहे. यापैकी ३ हजार ४९ लोकांचा मृत्यू झाला असून ३६ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

 

News English Summary: Mumbai, the financial capital of the country, is currently the hotspot of Corona. Mumbai’s Dharavi Corona is literally in its infancy, with 50 to 100 new patients being found here every day. In the last 24 hours, 44 new corona patients have been found in Dharavi and three have died. As a result, the number of corona virus patients in Dharavi alone has reached 1200 and so far about 60 people have lost their lives due to corona.

News English Title: More covid 19 patients found in Mumbai Dhavari hot spot News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x