आत्मनिर्भर बना, १३ कोटी नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता - सविस्तर वृत्त
नवी दिल्ली, १८ मे: जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतालाही कोरोनाचा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदे ठप्प आहेत. अर्थचक्रही मंदावलं असून, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात 13.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. तसेच १२ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या कक्षात येऊ शकतात. महारोगराईचा परिमाण लोकांच्या उत्पन्नासह बचत, खर्चावरही होणार आहे.
कोरोना व्हायरसचं संकट अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकतं. कोरोना व्हायरसमुळे भारतातील १३.५ कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते तसंच १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात असं इंटरनॅशनल मॅनेजमेंट कंस्लटिंग फर्म ‘आर्थर डी लिटिल’च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी होणार असून जीडीपीमध्येही मोठी घरसण होणार असल्य़ाचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनी आर्थर डी लिटिलच्या अहवालानुसार, कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम देशातील लोकांच्या नोकर्यांवर होणार आहे. दारिद्र्य वाढणार असून, त्याचा लोकांच्या दरडोई उत्पन्नावर परिणाम होणार आहे. यामुळे सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) प्रचंड घट होईल. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपीमध्ये १०.८ टक्क्यांची घट होईल आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपीमध्ये ०.८ टक्क्यांची वाढ होईल. अहवालानुसार, देशात बेरोजगारी ७.६ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे १३.५ कोटी लोक रोजगार गमावू शकतात. तर १७.४ कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर १२ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या कक्षात येऊ शकतात आणि ४ कोटी लोक अत्यंत गरिबीत पोहोचू शकतात.
या अहवालामध्ये केंद्र सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या पावलांचं कौतुक करण्यात आलं आहे. परंतु अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी धोरणं अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं मत आर्थर डी लिटिलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर बार्निक मित्रा यांनी सांगितलं.
News English Summary: The country’s economic cycle has also stopped. Meanwhile, the shocking fact that the corona could put 13.5 crore people in the country at a loss is a shocking fact, according to a report.
News English Title: Covid 19 Could Cost 135 Million Jobs Push 120 Million People Into Poverty In India Lockdown Corona virus News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC