20 April 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Navratri 2020 | नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर

Navratri Utsav 2020, covid 19, Maharashtra Government, Guidelines

मुंबई, २९ सप्टेंबर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या Navratri 2020 नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीमुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा ४ फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा २ फूट इतकी करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचं पालन करावं, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर पाळलं जाणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे नियमावली:

  • सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक.
  • कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय, महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं मंडपासाठी आखलेल्या नियमांचं पालन करणं अनिवार्य.
  • यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करणं अपेक्षित असल्यामुळं सार्वजनिक आणि घरगुती नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची सजावट तशीच असावी.
  • सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा ४ फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा २ फूट इतकी करण्यात आली आहे.

 

News English Summary: This year, the Garba Utsav 2020, Dandiya program has been banned. At the same time, instructions have been given to organize religious programs without crowds. In view of the Corona crisis, instructions have been given to follow the rules of social distance, to promote the government’s campaign ‘My family is my responsibility’ for the benefit of the people.

News English Title: Navratri Utsav 2020 covid19 Maharashtra Government issued guidelines Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x