15 December 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

News Latest Updates, Education Minister varsha Gaikawad, Corona Crisis

मुंबई, २० मार्च: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नववी आणि अकरावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येईल. राज्यातील दहावीच्या परीक्षेचे दोन पेपर अजून राहिले आहेत. हे दोन्ही पेपर पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील. राज्यातील शिक्षक-शिक्षिकांनी पुढील आदेश येईपर्यंत घरातूनच काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आलं आहे. हे सर्व निर्णय राज्य बोर्डाच्या बाबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३१ मार्चपर्यंत राज्यात महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच शिक्षकांना उत्तरपत्रिकांची तपासणी घरात करायला देण्याबद्दल शिक्षण मंडळाने काही आक्षेप नोंदविले आहेत. त्याबद्दल अजून निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

 

News English Summery:  School Education Minister Varsha Gaikwad has decided to cancel 1st to 8th exams in the state due to corona virus infection. He informed reporters on Friday. As many as 52 people have been infected with corona virus till Friday morning in the state. Varsha Gaikwad said that the first and eighth exams in the state have been canceled. The examinations will be held after April 15. There are still two papers of Class X exams in the state. Both of these papers will be on a pre-planned schedule. They have also ordered the teachers to work from home till further orders. According to the information given by Varsha Gaikwad, all the students have been given marks in the examination center. He also made it clear that all these decisions were about the state board. Meanwhile, Chief Minister Uddhav Thackeray has made significant changes in the state till March 31. Also, the Education Board has made some objections to allowing teachers to check the answer sheets at home He said that no decision has been taken yet.

 

News English Title:  Story School examination of first to eight standard has been cancelled says Education Minister Varsha Gaikawad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x