8 September 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Money | नोकरदारांनो! टेन्शन नको, मिळेल 50,000 रुपये पेन्शन; महिना खर्चाचं टेन्शन मिटेल - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 09 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
x

'आरे'मध्ये दंडुकेशाही; कलम १४४ लागू, पत्रकारांना देखील ताब्यात घेतलं

SaveAarey, Save Aarey, Section 144 imposed, Save Forest, Trees Cutting, Metro 3, Metro Car Shade

मुंबई: आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं.

आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास साडेतीनशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे काम पोलिस सुरक्षेत सुरू होतं. पर्यावरण प्रेमींना याची माहिती कळताच त्यांनी ‘आरे’मध्ये धाव घेतली. यामुळे ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं.

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. रात्रीच्या अंधारात झाडं कपण्याचा हा प्रकार फार काळ लपू शकला नाही. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागला. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x