18 May 2021 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

'सेनेला मत म्हणजे भाजपला मत', समाज माध्यमांवर जोर धरला

मुंबई : २०१४ पासूनच्या सर्व निवडणुकीत शिवसेनेने नेहमीच मराठी माणसाच्या समोर मनसेबद्दल एक संभ्रम उभा करून ठेवला, तो म्हणजे जर मनसेच्या उमेदवाराला मतं दिली तर शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसून त्याचा थेट फायदा काँग्रेसला होतो. परंतु मराठी मतदार हा सर्वच पक्षांना म्हणजे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुद्धा मतदान करतो हे वास्तव शिस्तबद्ध लपवून नेहमीच मनसेबद्दल संभ्रम कायम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नं केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये घेतलेली प्रचंड जाहीर सभा आणि त्याला स्थानिकांचा मिळालेला प्रतिसाद हा पालघरमध्ये मनसेची ताकद दाखविण्यासाठी पुरेसा होता. मनसेने जर त्यांचा उमेदवार पालघर पोटनिवडणुकीत दिला असता तर शिवसेनेला पराभवाचं खापर फोडण्यासाठी आयतच कारण मिळालं असत. तेच पराभवाचं कारण नसल्याने, अखेर पालघर पोटनिवडणुकीतील पराभवच सर्व खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आलं आहे.

२०१४ पूर्वी शिवसेनेने नेहमीच मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा भास मराठी मतदाराच्या मनात निर्माण केला. वास्तविक २०१४ पासून शिवसेनेच एकूणच निवडणुकीआधीच प्रचार तंत्र आणि निवडणुकी नंतरची भूमिका बारकाईने पाहिल्यास, सध्या शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत अशी मराठी मतदारांची धारणा होऊ लागली आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तेतील सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारताच त्यांनी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच पत्रकार परिषद आटोपती घेतली हे पाहायला मिळाल.

एका बाजूला देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही म्हणायचे आणि दुसऱ्याबाजूला त्याच भाजप बरोबर सत्तेत खेटून राहायचे हे शिवसेनेचे तंत्र मतदाराला चांगलेच उमगले आहेत. दुसरी बाजू म्हणजे शिवसेनेने स्वतंत्र निवडणूका लढविण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्यांचे मंत्री केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील आहेत. विशेष म्हणजे ते आजही एनडीएचा भाग आहेत. कारण टीडीपी ने सुद्धा सत्तेचा त्याग केला, परंतु त्यांनी एनडीएतून सुद्धा काडीमोड घेतला आहे. परंतु शिवसेनेने एनडीए मधील सहभागाबद्दल काहीच वाच्यता केलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकत याचा अंदाज येतो.

त्यामुळे यापुढे शिवसेनेने मराठी मतदारांपुढे पुन्हा मनसेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यांच्या अंगलट येऊ शकतो, कारण मागील ४-५ वर्षातील शिवसेनेचे निवडणुकीचे तंत्र मराठी माणसाने अनुभवले असून उलट ‘शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत’ असं वातावरण समाज माध्यमांवर होऊ लागलं आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1082)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x