27 April 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात, तर मग उठतात कधी?, वेंदाता प्रकल्पावरून अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar

Vedanta Foxconn Project | वेंदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आज या प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेना आंदोलन करत आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येणार असलेला प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यानं एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.

तसेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील १ लाख ५८ हजार कोटींचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. याच्याविरोधात आम्ही आज आंदोलन करत आहोत. वेंदाता-फॉक्सकॉन यांचं संयुक्तरित्या पुण्याच्या तळेगावमध्ये प्रकल्प करण्याचं ठरलं होतं. गुजरातपेक्षा चांगलं वातावरण महाराष्ट्रात असताना राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी केला आहे. अशा पद्धतीचं आंदोलन सबंध महाराष्ट्रात होणार असल्याचं चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवारयांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मग एकनाथ शिंदे उठतात कधी :
तरुणांनी वेदांतावरून पेटून उठलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली सरकार जनतेला गाजर दाखवत आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात तर मग उठतात कधी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCP leader Ajit Pawar criticized CM Eknath Shinde over Vendata Project moved to Gujarat check details 15 September 2022.

हॅशटॅग्स

#Vedanta Foxconn Project(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x