27 May 2022 6:24 AM
अँप डाउनलोड

अजित पवारांना गुजरातच्या वॉशिंगपावडरने धुण्यास सुरुवात; सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरण बंद?

Ajit Pawar, Devendra Fadnavis

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक गंभीर प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरण झाली असली तरी भाजप पक्ष स्वतःच्या पक्षात आणण्यापूर्वी नेत्यांना क्लीनचिट देण्याचे अमिश दाखवतो असंच काहीस समोर येताना दिसत आहे. त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यावर रावसाहेब दानवे म्हणाले होते निर्लज्जासारखे म्हणाले होते की, आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर आहे, ज्यामध्ये आम्ही इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना धुतो आणि मगच पक्षात प्रवेश देतो.

अजित पवार जेव्हा भाजपच्या गळाला लागले तेव्हा त्यांना देखील असंच आमिष आणि वचन दिलं असणार असा आधीच करण्यात येत होता. मात्र त्याला आता दुजोरा मिळताना दिसत आहे. करणं भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचं वृत्त मणिकंट्रोल’ने दिलं आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. देवेंद्र फडणवीस हे २०१२ मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्याने आज काही केसेस बंद करण्यात आल्या असून जर त्यामध्ये अजून काही माहिती समोर आली किंवा न्यायालयाने आदेश दिला तर पुन्हा सुरु करण्यात येतील असं सांगितलं आहे. “सिंचन घोटाळ्याशी संबंधित तीन हजार कंत्राटांचा आम्ही तपास करत आहोत. ज्यांची चौकशी बंद करण्यात आली आहे त्या नियमित केसेस असून, इतर तपास नेहमीप्रमाणे सुरु आहे,” असं एसीबीचे डीजी परमबीर सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. मात्र काही केसेस बंद आणि इतर सुरु हे म्हणजे उडवाउडवीची उत्तरं असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे उद्या बहुमत सिद्ध करण्यात भाजप आणि अजित पवार फसले तर मात्र महाविकासआघाडी देखील अजित पवारांना सोडणार नाही असं चित्र निर्माण होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(184)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x