14 September 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यातील जात प्रमाणपत्र वाद वाढल्याने अडसूळ रडारवर? | काय आहे प्रकरण

Anandrao Adsul

अमरावती, २८ सप्टेंबर | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यात मागील सात वर्षांपासून राजकीय द्वंद सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला या दोन राजकीय नेत्यांमधील हा संघर्ष अजूनही कायम आहे. दरम्यान मुंबईतील सिटी बँक प्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी ईडीचे पथक सोमवारी गेले व पथकाने अडसुळांची चौकशी केली. त्यानंतर अडसूळ यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाला सुध्दा राणा आणि अडसूळ यांच्यातील राजकिय संघर्षाची किनार असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्यांमध्ये आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

In the Citibank case in Mumbai, the ED team visited the residence of former MP Anandrao Adsul in Mumbai on Monday and the team inquired about Adsul. Adsul has since been admitted to the hospital due to health problems :

२०१४ साली निवडणूकीच्या काळात एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला आणि ताे वाद पोलिस ठाण्यात गेला होता. त्यानंतर अधूनमधून राजकीय आरोप प्रत्यारोप या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सुरू आहेत. दरम्यान २०१७ मध्ये खासदार अडसुळांच्या दोन निकटच्या व्यक्तींनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप करून मुंबईच्या जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचा जात पडताळणी समितीने निकाल नवनीत राणा यांच्या बाजूने देत त्यांचे प्रमाणपत्र वैध असल्याचे ठरवले होते. याचदरम्यान २०१८ मध्ये मुंबईतील सिटी बँक प्रकरणात आमदार रवी राणा यांनी खासदार अडसूळ यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी तेव्हापासून सुरूच आहे.

दरम्यान २०१९ ला पुन्हा लोकसभा निवडणूक आली. या निवडणुकीत पुन्हा एकदा तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा एकमेकांविरुध्द राजकिय मैदानात आले. या निवडणुकीत खासदार अडसूळ यांचा पराभव करुन नवनीत राणा अमरावतीच्या खासदार झाल्यात. त्यानंतर माजी खासदार अडसूळ यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेवून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे आता हे राजकीय नाट्य आणखी काही दिवस रंगण्याची शक्यता असून यावरून आता शिवसेना पुन्हा रडावर आल्याचेही यानिमित्ताने सांगण्यात येत आहे.

राणांच्या खासदारकीची सुनावणी सुप्रीम कोर्टात:
या प्रकरणात पाच ते सहा महिन्यांपूर्वी निर्णय देवून अडसूळ यांच्या बाजूने निकाल लागला. त्यावेळी उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकीच एकप्रकारे धोक्यात आली होती. त्यामुळे नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. एकंदरीत अडसूळ आणि राणा यांच्यातील मागील सात वर्षांपासून सुरू असलेले राजकीय द्वंद पाहता अडसुळांची ईडीकडून सुरू झालेल्या चौकशीला सुध्दा याच राजकिय संघर्षाची किनार असू शकते, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सोमवारी दिवसभर शहरात सुरू होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ED raid is on the brink of a political tussle between Amaravati former MP Anandrao Adsul and MP Navneet Rana.

हॅशटॅग्स

#AnadraoAdsul(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x