16 December 2024 12:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शिवसेनेमुळे तिकीट कापलं गेल्याने किरीट सोमैयांचा जीव अजून वर-खाली होतोय? - सविस्तर वृत्त

Adnya Naik, Kirit Somiya, Anvay Naik

मुंबई, १२ मार्च: एकाबाजूला किरीट सोमैया ऑनलाईन सहज उपलब्ध होणारे सातबारा उतारे डाउनलोड करून काहीतरी मोठं सिक्रेट शोधून काढल्याचा ट्विटर आणि पत्रकार परिषदेत कांगावा करत आहेत. त्यात राज्य सरकार आणि स्वतः विरोधी पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या आरोपांची हवाच निघून जातेय. त्यात आरोप करण्याचा त्यांचा मोठा इतिहास असल्याने माध्यमं देखील त्यांना सिरीयस घेताना दिसत नाहीत.

त्यात नाईक कुटुंबीय बिनधास्त पत्रकार परिषदेत जमीन व्यवहार माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात गुन्हा तो काय असं जाहीरपणे सांगत असल्याने त्यात न्यायालयीन लढाई देखील कुचकामी ठरणार हे सोमैयांना माहित असावं. त्यात त्या जमिनीचा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.

माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु, असे आज्ञा नाईक यांनी सांगितले होते. या उत्तराने आता काय बोलावं अशी अवस्था किरीट सोमैयांची झाली आहे. त्यात सध्या भाजपमध्ये त्यांची राजकीय अवस्था काँग्रेसमधील संजय निरुपम यांच्या प्रमाणे आहे. कारण दोघांनाही स्वतःच्या पक्षात कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रकाशझोतात राहण्यासाठी त्यांच्याकडे देखील ७/१२ उताऱ्यांशिवाय दुसरे उद्योग राहिले नसल्याचं सत्ताधारी सांगत आहेत.

त्यात जिथे लोकसभेचं तिकीट पक्ष देऊ इच्छित नाही, मग राज्यसभेची स्वप्नं पाहून देखील उपयोग नाही अशी स्थिती आहे. त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मुलुंड मध्ये भाजपमधील अर्थसंपन्न असलेल्या नेत्यांची चलती झाल्याने त्यांची अवस्था राजकीय दृष्ट्या गोंधळल्यासारखी आहे. त्यात कोणावरही बेछूट आरोप करण्याचा इतिहास राहिल्याने सत्तेतील किंवा विरोधी पक्षात कोणीही मित्र उरलेले नाहीत, अशी देखील परिस्थिती आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष करून किरीट सोमैयांमुळे सरकार हलतंय किंवा कोसळतंय का याची ते आतुरतेने वाट पाहता आहेत. ते असेच सुरु राहिले तर त्यांची राजकीय अवस्था अजून बिकट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमुळे लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापलं गेल्याच्या द्वेषातून ते जेवढ्या लवकर बाहेर येतील तेवढ्या लवकर ते स्वतःच राजकीय भविष्य सुरक्षित करतील. अन्यथा त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द असाच जीव वर खाली करण्यात निघून जाण्याची अधिक शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.

 

News English Summary: My father was an architect. They may have sold lands to several leaders. Until the very end, he was plotting to sell the land. What’s wrong with that? We are ready to give information about all the satbars of the land being alleged by the BJP leaders said Adnya Naik to answer Kirit Somiya.

News English Title: Why Kirit Somaiya is playing anti Shivsena politics every minutes news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x