अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारनं दाबलं होतं | जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
मुंबई, 8 नोव्हेंबर : Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांनाच लक्ष केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “अन्वय नाईक आत्महत्या (Anvay Naik Suicide Case) प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही,”अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
एनसीपीचे वरिष्ठ नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या संवाद साधताना राज्य सरकारची बाजू मांडली. जयंत पाटील म्हणाले, ”अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेच्या अटकेशी पत्रकारीतेचा कोणताही संबंधित नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. ते एकटेच नाही, तर आणखी दोघांची नावं त्यात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे,” अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
“नाईक कुटुंबीयांनी कोर्टाला विनंती केली. त्यानंतर कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा चौकशीसाठी पुढे आलं. पूर्वीच्या फडणवीस सरकारनं हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. परंतु, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार घडला होता. दरम्यान, आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. सदर प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे,” असं म्हणत जयंत पाटील यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला.
News English Summary: Senior NCP leader and state Water Resources Minister Jayant Patil is currently on a tour of the Konkan. He spoke in support of the state government. Jayant Patil said that the arrest of Arnab Goswami had nothing to do with journalism. He never paid for a family in his personal life. So two members of that family committed suicide. Arnab Goswami’s name is mentioned in the suicide note written by Anvay Naik before the suicide. Not only that, but there are two more names in it. The police have arrested him in that case, said minister Jayant Patil.
News English Title: Minister Jayant Patil criticized former CM Devendra Fadnavis over Arnab Goswami arrest news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH