अर्णब गोस्वामी प्रमाणेच राम कदम म्हणाले 'कान खोलकर सुन लो'...अगर
मुंबई, 8 नोव्हेंबर : Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला.
त्यानंतर, आज पुन्हा एकदा अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाला (Prabhadevi Siddhivinayak Temple) साकडे घातले आहे. तसेच, अर्णब गोस्वामींच्या सुटकेनंतरच आम्ही दिवाळी साजरी करू, असे देखील कदम यांनी प्रसार मध्यमांशी संवाद साधताना म्हटले. आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा केली, त्यावेळी अर्णब यांच्या सुटकेसाठी श्री सिद्धीविनायकाला साकडे देखील घालण्यात आले.
महाराष्ट्र सरकार कान खोलकर सुन ले यदी #ArnabGoswami के सर के बालको भी धक्का लगा . तो अब यह देश की जनता बर्दाश्त नहीं करेगी अरे दुर्योधनका भी अहंकार नहीं टिका यह भूल मत जाना . बहोत जल्द तुम्हें इसकी क़ीमत चुकानी होगी #ArnabWeAreWithYou #EmergencyInMaharashtra #ArnabLifeIsInDanger
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 8, 2020
महाविकास आघाडी सरकारला अर्णब गोस्वामी यांना या प्रकरणात अडकवायचे आहे. त्यामुळेच त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली. अर्णब यांच्या केसाला जरी धक्का लागला तर, देशातील जनता हे कदापी सहन करणार नाही. येत्या काळात ठाकरे सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा देखील कदम यांनी दिला.
News English Summary: For the release of Arnab Goswami, Ram Kadam has placed Prabhadevi Siddhivinayak Temple at Prabhadevi. “We will celebrate Diwali only after the release of Arnab Goswami,” Kadam told reporters. MLA Ram Kadam walked from his residence in Ghatkopar to Prabhadevi’s Siddhivinayak temple, at which time Shri Siddhivinayaka was also laid to rest for Arnab’s release.
News English Title: BJP MLA Ram Kadam warn state government after shifting Arnab Goswami to Taloja Jail news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा