अन्वय नाईक आत्महत्या | पूर्वीच्या चौकशी अहवालातील त्रुटी अर्णबसाठी कायदेशीर पळवाट?
मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
अर्णब गोस्वामी (Republic TV Editor in Chief Arnab Goswami) यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान काल अर्णब यांना बुधवारी अलिबाग येथील (Alibaug Court) मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यादरम्यान त्यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कोर्टात केला. मात्र फेरवैद्यकीय तपासणीनंतर हा आरोप कोर्टाने फेटाळून लावला. यानंतर अर्णब तसेच संबंधित इतर २ आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तीवाद सुरु झाला. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत हा युक्तीवाद सुरु होता.
अर्णब गोस्वामींच्या वतीने वकील गौरव पारकर, फिरोज शेख (Firoz Shaikh) यांच्यावतीने वकील निहा राऊत तर नितेश सारडा (Nitesh Sarda) यांच्यावतीने वकील सुशील पाटील यांनी कोर्टात बाजू मांडली. तर सरकारी अभियोक्ता म्हणून वकील रुपेश महाकाळ यांनी संपूर्ण काम पाहिले. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी कोर्टात तपासात काही निष्पन्न झाले नाही असा अहवाल दिला आहे. नेमका तोच कोर्टाने ग्राह्य धरला. विशेष म्हणजे हा अहवाल मागे घेऊन फेरतपास करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला असला तरी कोर्टाने त्यास कोणतीही परवानगी अजून तरी दिलेली नाही, त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा यावेळी आरोपींच्या वतीने कोर्टात उपस्थित करण्यात आला. कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरला.
मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करणं महत्वाचं आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. त्यासाठी साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपींची गरज आहे. या प्रकरणातील कागदपत्रं ताब्यात घेऊन सखोल तपासायची आहेत आणि त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे अशी मागणी सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आली. परंतु आरोपींच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढला. अखेर कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी देण्याची विनंती फेटाळून लावली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
News English Summary: The BJP has strongly condemned the arrest of Arnab Goswami (Republic TV Editor in Chief Arnab Goswami). Also, through social media, we have seen strong criticism of the Thackeray government. Meanwhile, Arnab was produced before the Chief Justice’s Court at Alibaug Court on Wednesday. Meanwhile, he accused the police of beating him. However, after a re-medical examination, the court dismissed the allegation. After this, an argument started for Arnab and 2 other accused to get police custody. The argument started from 6 pm to 11 pm.
News English Title: Republic TV Editor in Chief Arnab Goswami presented in Alibaug court News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट