14 July 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मध्ये तुफान तेजी येण्याचे संकेत Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार पॉझिटिव्ह परिणाम NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा Inox Wind Share Price | पटापट कमाईची संधी! यापूर्वी 1700% मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर श्रीमंत करणार TCS Share Price | तज्ज्ञांकडून TCS शेअरसाठी BUY रेटिंग, मालामाल करणार शेअर, पुढची टार्गेट प्राइस नोट करा
x

अन्वय नाईक आत्महत्या तपासाची दिशा भरकटवण्याचा भाजपचा प्रयत्न - शिवसेना

Shivsena MP Sanjay Raut, BJP former MP Kirit Somaiya, Anvay Naik

मुंबई, १३ नोव्हेंबर : अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात (Anvay Naik Suicide Case) अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये तब्बल २१ जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केला आहे. ‘या दोन कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

‘कोणी काय व्यवहार करावा आणि कशासाठी करावा? हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते सांगू शकत नाहीत. वास्तविक सदर प्रकरण हे एका व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात आहे. एकाबाजूला त्यांची पत्नी व कन्या न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्याबद्दल शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते बोलत नाही. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना हे कुठलेही फालतू मुद्दे घेऊन पुढं येताहेत. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.

‘आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. २१ व्यवहार केल्याचा आरोप करताहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार,’ असं देखील राऊत यांनी ठणकावलं.

 

News English Summary: Since the arrest of Arnav Goswami in the Naik suicide case under architect Anwai, the Bharatiya Janata Party (BJP) has been aggressive against the Thackeray government. Former MP Kirit Somaiya has revealed in a press conference that 21 land transactions have taken place between Naik and Thackeray family. What exactly is the relationship between these two families? He had also demanded that Chief Minister Uddhav Thackeray should give an explanation in this regard. Sanjay Raut, while talking to reporters today, strongly responded to these allegations of Kirit Somaiya.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP former MP Kirit Somaiya allegations over Thackeray family news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x