12 December 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Nawab Malik Vs Sameer Wankhede | किडनॅपिंग व खंडणी वसुलीच्या उद्देशाने आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं - नवाब मलिक

Nawab Malik Vs Sameer Wankhede

मुंबई, 07 नोव्हेंबर | आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा (Nawab Malik Vs Sameer Wankhede) मलिक यांनी केला.

Nawab Malik Vs Sameer Wankhede. Aryan was brought on the cruise through Pratik Gabha and Amir Furniturewala. It’s all about kidnapping and extortion. The mastermind of the kidnapping is Mohit Kamboj :

कोर्टाच्या कारवाईत एक गोष्ट वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडेची मदत त्याने वारंवार घेतली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन प्रकरणी एनसीबीची पोलखोल केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं मलिक म्हणाले.

आर्यन खानप्रकरणी 18 कोटीत डील झाली होती. 50 लाख रुपये उचललेही होते. पण एका सेल्फीने सर्व खेळ बिघडवला. मोहित कंबोज किडनॅपिंगचा मास्टरमाइंड आहे. खंडणीवसूलीत मोहित कंबोज वानखेडेंचा साथीदार आहे, असा दावाही त्यांनी केला. आता पूजा ददलानीचं प्रकरण यात आलं. तुम्हीही 50 लाख रुपये दिल्याने तुम्हीही आरोपी व्हाल असं त्यांना घाबवरलं जात आहे. पण तुम्ही पीडित आहात त्यामुळे पूजा ददलानीने घाबरू नये, असं आवाहन मलिक यांनी केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nawab Malik Vs Sameer Wankhede private army exposed again in press conference.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x