VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबई, ०६ नोव्हेंबर | मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
Sunil Patil NCB Case. Manish Bhanushali and Sunil Patil, who are arbitrators in the Aryan Khan case, were caught on camera in Gujarat with Union Minister Amit Shah :
धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुनील पाटील याच्या मदतीने आर्यन खान प्रकरणातील संपूर्ण षडयंत्र रचण्यात आलं होतं. असा दावा मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. आपल्या पत्रकार परिषदेत कंबोज यांनी अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हीडिओ, ऑडिओ क्लिप आणि काही फोटो दाखवत दावे केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
मात्र त्यानंतर दुसरंच सत्य समोर येताना दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात पंच असलेला मनीष भानुशाली आणि सुनील पाटील हे गुजरातमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पाया पडताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे त्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी किती जवळचे संबंध आहेत ते उघड होतं आहे. वास्तविक मोहित कंबोज करायला गेले एक आणि झालं दुसरंच अशीच दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे सुनील पाटील हा मनीष भानुशाली यांच्या मार्फत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतो अशी माहिती समोर आली आहे. हाच मनीष भानुशाली भानुशाली भाजपचा पदाधिकारी असून त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो देखील यापूर्वीच समोर आले आहेत. मात्र त्यात आता सुनील पाटील यांचं नाव देखील जोडलं गेलं आहे असं म्हणावं लागेल.
सुनील पाटील इथे दिसला का? म्हणजे सुनील पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का? भाजपच्या नेत्यांनी नीट लक्ष देऊन कंबोजांनाही दाखवावे. pic.twitter.com/qgqARAll4w
— महाराष्ट्रनामा (@MahaNewsConnect) November 6, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sunil Patil NCB case connections with BJP in Gujarat state.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट