18 August 2019 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

डॉ. पायल तडवी आत्महत्या: तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. पायल तडवी आत्महत्या: तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : नायर रुग्णालयाच्या एमबीबीएस डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना कोर्टाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यांची ही शिक्षा वाढविण्यात आली असून १० जूनपर्यंत त्यांना कोर्टाच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच हे आत्महत्येचेच प्रकरण असून ही हत्या नसल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.

डॉ. पायल तडवी हिच्या कुटुंबीयांनी २ दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी या कुटुंबाने पायल तडवीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.

मुंबई पोलिसांनी पायल तडवी हिने आत्महत्या केल्यानंतरही आरोपी डॉक्टरांना अटक केली नव्हती. तसेच पायलच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असतानाही शवविच्छेदनात याबाबत माहिती नसल्याने पायलच्या कुटुंबियांना संशय आहे. याबाबत संबंधित डॉक्टर्सची, डिपार्टमेंट हेडची व पायलच्या सहकार्‍यांची चौकशी करण्यात आली नसल्याचीही कुटुंबियांची तक्रार आहे. त्यामुळेच हा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. नायर हॉस्पिटलच्या अटकेत असलेल्या ३ डॉक्टर्सविरोधात रॅगिंग प्रतिबंधक आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(263)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या