7 July 2020 9:28 PM
अँप डाउनलोड

डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला सीबीआयकडून अटक

पुणे : तब्बल पाच वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी अटक केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात हे पहिलं यश मानलं जात आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले सापडल्याचे वृत्त आहे. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले असून सचिन व शरद दोघे सुद्धा मित्र असल्याचे समोर येत आहे. सचिनला गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आल्याने अखेर त्याला एटीएसने ताब्यात घेऊन त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे समजते.

त्याच्या कुटुंबात पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत त्याचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. तसेच सचिनच्या फेसबुक अकांऊटची पडताळणी केल्यानंतर तो कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले होते आणि सुरक्षा यंत्रणेच्या एक एक पुराव्याला दुजोरा मिळत जात होता. येत्या काही दिवसात अनेक धक्कादायक खुलासे पोलीस चौकशीत समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x