25 September 2022 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

युपी निवडणूक | चंद्रकांतदादांना राज भेट नडली? | दिल्लीत ४ दिवस असूनही मोदी-शहांनी भेट दिली नाही

Raj Thackeray

मुंबई, १० ऑगस्ट | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मात्र अमित शहा यांनी भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्य संघटनेतील प्रमुख व्यक्ती आहेत. अमित शहा यांनी पाटील यांना भेटण्याचे टाळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शनिवारी दिल्लीला जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत दीड तास भेट झाली. पण चंद्रकांत पाटील दिल्लीत गेल्यावर अमित शहा यांनी भेट टाळली.

मुंबई महापालिका बरोबर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणुकही होणार आहे. मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी उत्तर भारतीयांचा मुद्दा सोडलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जिंकायचे आहे. अशातच जर भाजप-मनसे युती झाली तर उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेससह सर्वच विरोधीपक्ष भाजप-मनसे युती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तूर्त तरी भाजप-मनसे युतीबाबत निर्णय घेणे शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे.

अमित शहा-मोदींना चर्चेची माहिती देणार असं वक्तव्य:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी दिल्लीत गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेची संपूर्ण माहिती देणार असं वक्तव्य केलं होतं आणि ते माध्यमांमध्ये झळकलं. त्यानंतर मोदी-शहांनी चंद्रकांत पाटील यांना दूर ठेवणं पसंत केल्याचं वृत्त आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union home minister avoid meeting with Chandrakant Patil over meeting with Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x