5 June 2023 9:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

रश्मी ठाकरे कधीही चेहरा बदलणे, गाणे म्हणणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही - नीलम गोऱ्हे

Shivsena MLA Neelam Gorhe, Amruta Fadanvis, Anvay Naik

मुंबई, १२ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावे जमीन व्यवहार झाल्याची कागदपत्रं समाज माध्यमांवर शेअर केली होती. अमृता फडणवीस यांनीही रिट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं. “रश्मी ठाकरे कधीही गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही,” असा सणसणीत टोला निलम गोऱ्हे यांनी यावेळी लगावला. आमदार राम कदम यांच्यावर टीका करताना निलम गोऱ्हे यांनी मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे अशी टीका देखील केली.

 

News English Summary: Shisvena leader Nilam Gorhe spoke to the media at a press conference in Pune, at which he commented on the issue. “Rashmi Thackeray never fell into singing, changing her face, making different statements,” said Tola Nilam Gorhe. Criticizing MLA Ram Kadam, Nilam Gorhe said the leader who picked up the girls was talking about women’s safety. He also criticized that this is the biggest joke.

News English Title: Shivsena MLA Neelam Gorhe on Amruta Fadanvis Shivsena Anvay Naik Case News Updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x