8 December 2021 7:30 PM
अँप डाउनलोड

अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा; नेते व पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी

मुंबई : आज मुंबईतील एम.आय.जी क्लबवर पार पडलेल्या नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना सक्रिय राजकरणात आणण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली.

आजच्या बैठकीत मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेनी अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणण्याची जोरदार मागणी केली. मराठी हा मनसेचा श्वास असल्याने मराठीच्या मुद्यावर या बैठकीत विशेष जोर देण्यात आला.

मनसेने नाशिकमध्ये उत्तम काम करून सुद्धा पक्ष ते काम लोकांपर्यंत पोहोचवू शकलो नाही अशी खंत बाळा नांदगावकरांनी बोलून दाखविली. तसेच महाराष्ट्र सैनिकांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची वाट न पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काम केलं पाहिजे असं नांदगावकरांनी आवर्जून सांगितलं. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मुक्त संवाद करण्याचे स्वातंत्र्य देऊन पक्षात लोकशाही जिवंत आहे असा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे पक्ष नव्याने आणि जोरदार पणे कमबॅक करत आहे, त्याच योजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x