29 April 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

शरद पवारांचं सांगणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं | संजय राऊतांची प्रतिक्रिया

NCP President Sharad Pawar, Rahul Gandhi, MP Sanjay Raut

मुंबई, ५ डिसेंबर : काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (MahaVikas Aghadi minister Yashomati Thakur) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा, असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav thackeray ) त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा नामोल्लेख न करता दिला आहे.

शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर नाराज झाल्या असल्याचं दिसत आहे. त्यांनी ट्वीट करून सरकारमधील नेत्यांनी आघाडी धर्म पाळा, असं मोठं विधान शरद पवार यांच्या नामोल्लेख न करता केलं आहे.

या नाराजीवर भाष्य करत संजय राऊत यांनी काँग्रेसला राजकीय सल्ला दिला आहे. “राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि कामाला लागावं या मताचा मी आहे. हैदराबादमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. त्याउलट भाजपा ४ वरून ५०च्या आसपास पोहोचला. हे यश आहे. यश हे यश आहे. काँग्रेसने झोकून देऊन काम करायला हवं. निकालाची पर्वा न करता. निर्णयाची पर्वा न करता. ते लोकांना जेव्हा दिसेल. तेव्हा लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील,” असं राऊत म्हणाले. तसेच शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो.”

 

New English Summary: Congress leader and state Minister for Child and Women’s Welfare Yashomati Thakur has given the government a home run. If you want to run a stable government, avoid criticizing our leader, a direct warning given by Yashomati Thakur without naming Chief Minister Udhav Thackeray as well as NCP President Sharad Pawar.

News English Title: NCP President Sharad Pawar statment Sanjay Raut advice to congress leaders News Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x