27 May 2022 6:09 AM
अँप डाउनलोड

अल्बम मध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये; राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Raj Thackeray, Devendra Fadanvis

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरुन एकमेकांची खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उभे करता मोदींना आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराचं जोरदार रणशिंग फुंकलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचऱ्या भाषेत टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांची खिल्ली उडवली होती. परंतु फडणवीसांच्या या टीकेची राज ठाकरे यांनी त्याहीपेक्षा बोचरी टीका केली आहे.

अल्बमध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये’ असा टोला राज ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका करताना ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं’ असं म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यावर राज यांनी ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका साकारली होती त्यावरुन हा जोरदार टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x