9 July 2020 9:28 AM
अँप डाउनलोड

VIDEO: राज यांचं पाकिस्तानशी नातं काय विचारणारे तावडे तुलसी जोशींच्या उत्तराने तोंडघशी

BJP, MNS, Raj Thackeray, Tusli Joshi, Vinod Tawde

मुंबई : काल मुंबई भांडुप येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी देखील राज ठाकरे यांनी मोदींना विशेष लक्ष केलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा तेच भाजप समर्थकांच्या फेसबुक पेजवरील जाहिरातीतील कुटुंब पुन्हा समोर आणण्यात आलं आणि त्यांनी अधिक खुलासा देखील केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र भाजपने पुन्हा पत्रकार परिषद आयोजित करून अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित कुटुंबाचा फोटो हा २०१३ साली न्यूयॉर्क टाइम्स आणि पाक डिफेन्सच्या साईटवर देखील झळकला होता असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर विनोद तावडे यांनी सदर विषयाला अनुसरून राज ठाकरे यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावेळी तावडे यांनी, राज ठाकरे यांचं पाकिस्तानसोबत नेमकं नातं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला होता.

मात्र त्याच विनोद तावडे यांना मनसेचे पालघर येथील कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांनी एक व्हिडिओ पुरावा सादर करत चांगलीच चपराक दिली आहे आणि संपूर्ण भाजपचं त्या प्रश्नावरून तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून भाजप आयटी सेलचे कार्यकर्ते कसे गद्दार आहेत आणि ते पाकिस्तानसाठी कसं काम करतात याची अधिकृत बातमीच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुन्हा भाजप यावर निरुत्तर होण्याची शक्यता अधिक आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(631)#Vinod Tawde(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x