15 May 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी

Narendra Modi, Ajay Rai, BJP, Congress, Loksabha Election 2019

वाराणसी : पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वारणसीमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसने वाराणसीतून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ निवडणुकांमध्ये मोदींविरोधात अजय राय रिंगणात उतरले होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कॉंग्रेसने वाराणसीमधून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. प्रियंका गांधी वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चांना उधाणं आले होते. यावर आज पूर्णविराम लागला आहे. वाराणसी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा महाआघाडीत झालेल्या जागावाटपानुसार वाराणसीची जागा समाजवादी पक्षाला देण्यात आली आहे. याचबरोबर नुकतचं ‘काँग्रेस अध्यक्षांनी मला सांगितले तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास मला आवडेल’ असे प्रियंका गांधी यांनी म्हटल्यामुळे या चर्चांना उधाणं आले होते. वाराणसीत सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी मोदी उद्या म्हणजेच २६ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x