6 October 2022 8:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wrinkle Remedies | त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण वाढले आहे?, खास घरगुती उपायांसाठी या टिप्स फॉलो करा Airtel 5G Service | आजपासून देशातील या 8 शहरांमध्ये एअरटेल 5G सेवा सुरु, संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या Surya Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 11 दिवस या राशींच्या लोकांसाठी वरदानासारखे असतील, सूर्य राशी परिवर्तनाचा परिणाम Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल
x

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही | संजय राऊतांची संतप्त टीका

MP Sanjay Raut

मुंबई, ०६ सप्टेंबर | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बेळगावात भाजपचा विजय झाला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, संजय राऊतांची संतप्त टीका – MP Sanjay Raut criticizes BJP over Belgaum Municipal Election victory celebration :

मराठी माणूस हरल्याबद्दल?
संजय राऊत यांनी या मुद्यावरून संताप व्यक्त केला आहे. “बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे”, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.

यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल:
मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले आहेत.

जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही:
बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राचंया इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत आतापर्यंत गद्दारी कोणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना वेदना आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे. तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MP Sanjay Raut criticizes BJP over Belgaum Municipal Election victory celebration.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x