24 September 2023 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

MLA Ravi Rana | पत्नीच्या खासदारकीनंतर रवी राणांची आमदारकी धोक्यात? | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' आदेश

MLA Ravi rana

अमरावती, 12 ऑक्टोबर | बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक रुपये खर्च केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल आहे. मात्र, या तक्रारीवर कुठलीही कारवाई अद्याप झाली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या (MLA Ravi Rana) नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

MLA Ravi Rana. A Nagpur bench of the Bombay High Court has directed the State Election Commission (SEC) to take immediate action in the matter. The court order is likely to threaten MLA Ravi Rana’s legislature :

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून आमदार रवी राणा यांनी 41 लाख 88 हजार 402 रुपये निवडणूक प्रचारात खर्च केले होते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये निश्चित केली असतानाही रवी राणा यांनी अधिक खर्च केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दोन वर्षे उलटून गेल्यावरही याप्रकरणात निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी राज्य निवडणूक आयोग विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

६ महिन्यात होणार कारवाई:
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली. दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10 ए अंतर्गत कारवाई करण्याची नोटीस जारी केली असल्याचे न्यायालयासमोर माहिती दिली असून सहा महिन्यात या प्रकरणातील संपूर्ण कारवाई करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयासमोर म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा – Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline | राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राची मान्यता

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MLA Ravi rana case high court orders to election commission to proceed for disqualification action.

हॅशटॅग्स

#RaviRana(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x