29 April 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड पावसाळी अधिवेशनातही टळणार? | आघाडीचे प्रत्युत्तर

Mahavikas Aghadi

मुंबई, ०४ जुलै | मागील चार महिने रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दबावाला सरकार भीक घालत नसल्याचे दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आघाडीच्या समन्वय समितीत झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जशी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची शिफारस प्रलंबित ठेवली आहे, तसे आम्हीसुद्धा विधानसभा अध्यक्षपद प्रलंबित ठेवू शकतो, हे आघाडीला दाखवायचे आहे.

फेब्रुवारीत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. दोन अधिवेशने झाली, मात्र अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवून अध्यक्षाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. ५ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची आठवण दिली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपद निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती.

काही तरतुदी वगळता केंद्राचे कृषी कायदे चांगले असल्याचे प्रशस्तिपत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर आता आघाडी सरकार अधिवेशनात कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात कृषी कायद्यांना विरोध करणारा ठराव मंजूर केला जाणार आहे.

भाजपच्याच पावलावर पाऊल:
मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून भाजपचे शिवराजसिंह चौहान सरकार आले. तिथे १० महिने हंगामी अध्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहत होते. त्यामुळे आपणसुद्धा घाई करायची नाही, असे आघाडीच्या समन्वय समितीत ठरल्याचे एका नेत्याने सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MahaVikas Aghdi responds to state Governor blocking appointment of 12 MLAs news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x