23 September 2021 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा | वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान

Minister Vijay Wadettiwar

मुंबई, ०६ सप्टेंबर | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आला होता. आता पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तु जर बेछूट आरोप करत असशील, तु खऱ्या बापाची औलाद असशील तर वाटेल तसे आरोप करण्यापेक्षा हे आरोप सिद्ध करुन दाखव. असे म्हणत वडेट्टीवरांनी संताप व्यक्त केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा, वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान – Minister Vijay Wadettiwar will file defamation case against MLA Gopichand Padalkar :

50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार:
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी पडळकरांवर 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे. तसेच पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर त्यांनी आरोप करावे. आता ते कार्यकर्ते राहिले नाही तर आता आमदार झालेले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप त्यांनी केले पाहिजे.

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगायला हवे, पत्ता काढायला हवा. ती फॅक्ट्री कोणत्या नातेवाईकाची आहे हे देखील त्यांनी सांगावे. नाही सांगितले तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टामध्ये जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी असे आव्हान वडेट्टीवारांनी पडळकरांना दिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Vijay Wadettiwar will file defamation case against MLA Gopichand Padalkar.

हॅशटॅग्स

#VijayWadettiwar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x