23 September 2021 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Parenting | पालकांनी मुलांना समजूतदारपणा कसा आणि कधी शिकवावा? - नक्की वाचा

How parents should education the children's

मुंबई, ०६ सप्टेंबर | अनेकदा पालक आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात कि आपल्या मुलांनी सगळं काही समजून घ्यावे आणि अनेकदा त्याचा अपेक्षाभंग होतो कारण एकतर ते अति समजूतदारपणा अपेक्षित करत असतील किंवा त्यांना जसे काम हवे आहे तसे होत नसेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Parenting, पालकांनी मुलांना समजूतदारपणा कसा आणि कधी शिकवावा? – How parents should education the children’s :

अशा वेळेला आपण समतोल साधायला हवा आणि एकमेंकांना समजून घ्यायला हवं. मुलांना निरीक्षणावरून समजूतदारपणा येतो. आपले आई-वडील एकमेंकांशी आणि इतरांशी कसे वागत आहे याचे ते निरीक्षण करतात आणि त्यावरून त्यांचे वागणे ठरते. त्यामुळे मुलांच्या लहान वयापासून त्यांना वेगवेगळे संस्कार शिकवणे, आजी-आजोबांच्या सानिध्यात ठेवणे हे सरुवातीला केले पाहिजे. त्यावरून त्यांचा समजूतदारपणा वाढत जातो.

अशा प्रकारे आपण त्यांच्या कलेने घेतले तर त्यांना समजूतदारपणा हा वाढत्या वयाने वाढत जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोबत आणि वडिलधाऱ्यांसोबत चांगला वेळ घालवण्यास फुरसत मिळत नाही. व्यस्त कार्यकाळा मुळे आपण मुलांसोबत बसू शकत नाही आणि त्यांच्या कथा आणि वैयक्तिक समस्या ऐकू शकत नाही. त्यामुळे कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करण्यास प्राधान्य द्या. त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकता आणि आपल्या मताची एकमेकांबरोबर देवाणघेवाण करू शकता. ह्याचा आपल्या मुलांवर दीर्घकाळ प्रभाव पडतो.

मुलांनी विशिष्ट वस्तूंचे मूल्य जाणून घेतले पाहिजे, आणि आभार मानण्यास शिकले पाहिजे आणि जे मित्र मैत्रिणी त्या वस्तू विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासोबत वाटून घेण्यासाठी पुरेसं नम्र असायला हवे. तसेच त्यांना काही अमूर्त गोष्टी जसे की भावना, विचार शेअर करायला शिकवले पाहिजे. मूल प्रथम आपल्या पालकांसोबत आणि मग आजी आजोबा, भावंडं, चुलत भावंडं, विस्तारित कुटुंब आणि नंतर इतर लोकांसह सामायिक करणे शिकतील. शेअर करण्याचा हा दृष्टिकोन त्याला किंवा तिला एक चांगला व्यक्ती बनवेल.

आपल्या मुलांना सभ्य आणि जबाबदार नागरिक बनवा. आणि त्यांना समजावून सांगा की सार्वजनिक ठिकाणे घाण करण्यासाठी नसतात, त्यामुळे कचरा जवळच्या कचराकुंडीत टाकला पाहिजे. ही सोपी सवय विकसित करण्यात त्यांना मदत करा आणि त्यांना त्याचे सर्व ठिकाणी अनुकरण करण्यास सांगा, कारण यामुळे त्यांना एक चांगला नागरिक बनण्यास मदत होईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही अशी सवय करा, तुमची मुले नक्कीच तुमचे अनुकरण करतील.

जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर असाल तेव्हा गोष्टी टाकण्यासाठी कचराकुंडी शोधा. बाहेर पडताना सोबत एक पिशवी ठेवा आणि आपला सगळा कचरा त्यात गोळा करा, उदा: रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, पेपर नॅपकीन वगैरे. हॉटेलच्या टेबलवर कचरा तसाच राहू देण्यापेक्षा तो घरी आणून कचरापेटीत टाका. रस्त्याच्या कडेला, तसेच कारच्या खिडकीतून कुठेही फेकू नका, अन्यथा मुलं तुमचं निरीक्षण करतील आणि ते देखील तसेच करतील हे ध्यानात ठेवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How parents should education the children’s.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x