20 May 2022 9:02 AM
अँप डाउनलोड

Celebrates Vaccination | महागाई, बेरोजगारीच्या विक्रमाकडे दुर्लक्ष करत मोदी सरकारचं लसीकरण विक्रमावर सेलिब्रेशन

Celebrates Vaccination

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर | देशात कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा आकडा आज सकाळी 9.45 वाजता पूर्ण झाला आहे. शेवटचे 20 कोटी डोस 31 दिवसात घेतले गेले आहेत. लसीचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. यासाठी ट्रेन, विमाने आणि जहाजांवर लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करण्याची (Celebrates Vaccination) योजना आहे. तसेच, ज्या गावांनी 100% लसीकरण पूर्ण केले आहे त्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे.

Celebrates Vaccination. India completed administering 1 billion doses of Covid-19 vaccines on Thursday: an event the Modi government is celebrating with a song, promotional film and announcements on airplanes, ships and railway stations :

पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या निमित्ताने दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोहोचले. ते येथे सुमारे 20 मिनिटे थांबले. या दरम्यान त्यांनी आरोग्यसेवकांशी चर्चा केली.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या संदर्भात एक गाणे आणि एक चित्रपट लाँच करणार आहेत. हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर दुपारी 12.30 वाजता ठेवण्यात आला आहे. या गाण्यात कैलाश खेरने आवाज दिला असल्याचे सांगितले जात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 1400 किलोचा देशातील सर्वात मोठा तिरंगा लाल किल्ल्यावर लावण्याची अपेक्षा आहे.

देशात बेरोजगारी आणि महागाईचा विक्रम:
मागील काही वर्षांपासून देशात बेरोजगारी आणि महागाईने जागतिक विक्रम रचले आहेत. याच विषयांवर सत्तेत आलेले मोदी किंवा इतर भाजप नेते भाष्य देखील करताना दिसत नाहीत. देशभरात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ते अगदी दैनंदिन भाज्यांपासून ते कडधान्यांपर्यंत सर्वच एवढं महाग झालं आहे की भविष्यात याच विषयावरून लोकं आत्महत्या देखील करू लागतील. परंतु सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या विषयावर भाजप नेते काहीच बोलत नाहीत. तसेच देशात लाखो लोकांचा कोरोनामुळे जीव जातं असताना बघ्याची भूमिका घेणारं केंद्र सरकार आता कोविड लसीकरणाचे सिलेब्रेशन करून लोकांना एकप्रकारे बेरोजगारी आणि महागाईच्या विक्रमापासून विचलित करत आहेत अशी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Celebrates Vaccination by Modi government after India completed administering 1 billion doses of Covid 19 vaccines.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x