25 April 2024 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

कोरोना आपत्तीत मध्य प्रदेशनंतर भाजपने राजस्थानवर मोर्चा वळवला?

Rajasthan, Deputy CM Sachin Pilot, CM Ashok Gehlot

नवी दिल्ली, १२ जुलै : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शनिवारी सीएम अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. पण या बैठकीला सचिन पायलट उपस्थित नव्हते. सध्या ते दिल्लीत आहेत. राजस्थानचे जवळपास 10 आमदार दिल्लीत आहेत. हे आमदार काँग्रेसच्या प्रमुखांना भेटून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत. हे आमदार गुरुग्रामजवळ थांबले आहेत. जयपूरमध्ये काँग्रेसचे आमदार जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. पण हे आमदार उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासोबत आहेत असं त्यांनी म्हटलं नाही.

काँग्रेस पक्ष २०१८मध्ये राजस्थानात सत्तेत आल्यानंतरच अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात वादाची थिणगी पडली होती. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या नेतृत्त्वापासून याची सुरूवात झाली होती. त्यानंतर जेव्हा काँग्रेसनं तिसऱ्यांदा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर वादाची ही दरी आणखी वाढली. या मागील महत्त्वाचं कारण म्हणजे २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मानहाणीकारक पराभव झाल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेस प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीचं मोठं काम केलं होतं. त्यानंतर खातेवाटपावरूनही दोन्ही नेत्यांमधील नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.

राजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेत गेहलोत यांच्यावर आरोप केला आहे की, आम्हाला गेहलोत बाजुला ठेवत आहेत. यावर पटेल यांनी पायलटना तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे गेहलोत वरिष्ठ नेत्यांना राज्यात सारेकाही ठीक असल्याचे सांगत आहेत. दरम्यान पायलट यांना राजस्थानच्या एसओजीने चौकशीसाठी बोलावले आहे.

 

News English Summary: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot is trying to save his government in Jaipur. On the other hand, Deputy Chief Minister Sachin Pilot has reached Delhi. Chief Minister Gehlot has said that BJP is trying to overthrow his government.

News English Title: Will Jaipur Go Bhopal Way Congress Leadership Alarmed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x