9 October 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

...तर राज्यसभेतही भाजपच्या नेतृत्वाखालील NDA बहुमताच्या जवळ असेल?

Rajya Sabha Election 2020

नवी दिल्ली, १९ जून : देशाच्या 8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, झारखंडमधील 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यापैकी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढाई होणार आहे. या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी जागांचे चित्र आज सायंकाळीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि प्रत्येक उमेदवार व मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

काय आहे राज्यसभेचं गणित?
सध्याच्या स्थितीत राज्यसभेत 224 खासदार आहे. तर 21 जागा रिकाम्या आहेत. 27 जूनपर्यंत एकूण 27 जागा रिकाम्या होतील. आज 19 जागांसाठी मतदान होईल तर 3 जागा नंतर भरल्या जातील. सध्याच्या स्थितीत सभागृहात एनडीएकडे 91 जागा आहेत. तर बिगर एनडीए आणि बिगर यूपीए खासदारांची संख्या 68 इतकी आहे. यूपीएकडे एकूण 61 खासदार असून त्यातील 39 खासदार काँग्रेसचे आहेत. आज होणाऱ्या निवडणुकीतनंतर भाजपचे 9 खासदार वाढण्याची शक्यता आहे, तर त्याचवेळी काँग्रेसचे 2 खासदार कमी होतील.

दरम्यान, मणीपूरमधील सत्ताधारी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाने येथून लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे.

 

News English Summary: Elections for 19 Rajya Sabha seats in 8 states of the country will be held today. These include four each in Andhra Pradesh and Gujarat, three each in Madhya Pradesh and Rajasthan, two each in Jharkhand and one each in Manipur, Mizoram and Meghalaya. In Madhya Pradesh, Gujarat and Rajasthan, there will be a fierce battle between the Congress and the BJP.

News English Title: High stake Rajya Sabha election 2020 today for 10 states BJP in majority News latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x