26 April 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपने गुजरातमध्ये तिकीट दिलेल्या अल्पेश ठाकोरने उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, राज ठाकरेंनी करून दिली आठवण

MNS Chief Raj Thackeray

MNS Chief Raj Thackeray | गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

रेल्वेचं आंदोलनाचा मुद्दा :
राज ठाकरे भाषणात म्हणाले, रेल्वेचं आंदोलन झालं. मनसेचं टोलविरोधी आंदोलनं लोकं विसरले नाहीत. रेल्वेच्या परीक्षा द्यायला आलोत. महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. तिथं बाचाबाची झाले. मनसे सैनिकाला आईवरून शिवी दिली. त्यानंतर पुढचा हंगामा झाला. आमचं आंदोलन युपी बिहार विरोधात नव्हेते तर तिथे आलेल्या उमेदवारांविरोधात होते असं राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली.

यावेळी त्यांनी अल्पेश ठाकोरचे उदाहरण दिले. अल्पेश ठाकोरने एका घटनेनंतर गुजरातमधून 20 हजार उत्तर भारतीयांना हकलून लावले होते. त्यावेळी माध्यम कसे शांत होते. त्याच अल्पेश ठाकोरला भाजपने निवडणुकीत तिकीट दिलं होतं अशी आठवणही राज ठाकरेंनी करून दिली.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होते. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदी तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray talked on BJP leader Alpesh Thakur check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x