2 May 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

सावधान! शिवसेनेतील तरुण आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला खरा पण उद्या हाच नारा शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत ठरू शकतो अशा राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेत तरुण आमदार आणि वरिष्ठ आमदार असे दोन गट पडले असून मातोश्रीवर वरिष्ठ आमदारांचा दबदबा असल्याने तरुण आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचे समजते.

आगामी निवडणुकीत भाजपची साथ सोडू नये यासाठी तरुण आमदारांचा एक गट कार्यरत झाला आहे. परंतु वरिष्ठ आमदारांचा गट उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याने पक्ष प्रमुखांच्या या निर्णयामुळे पक्षात दुफळी माजू शकते असं विश्वसनीय वृत्त आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेत केवळ वरिष्ठ आमदारांनाच महत्व आणि मंत्रिपद तसेच महत्व दिल जात अशी या तरुण आमदारांची खदखद आहे जी पडद्यामागे उफाळून येत आहे.

ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे सोडल्यास सर्वच मंत्री हे विधानपरिषदेवर निवडून आलेले आहेत आणि आम्ही जनतेतून निवडून येऊन सुद्धा आम्हाला साधं विचारात सुद्धा घेतलं जात नाही तसेच मंत्रिपद सुद्धा दिली जात नाहीत अशी खदखद त्या तरुण आमदारांच्या गटात वाढीस लागली आहे. त्यामुळे ती खदखद लवकरच उफाळून येणार असल्याचे समजते.

त्यातच पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिल्याने आपण सध्या आमदार असलो तरी पुन्हा निवडून येऊ की नाही या बाबतच त्याच्या मनात शंका आहे. त्याच भीतीपोटी ते भाजपशी युती करावी यासाठी दबाव आणत आहेत, परंतु वरिष्ठ आमदारांचा आणि मंत्र्यांचा गट त्याला विरोध करत असल्याने पक्षात निवडणुकीच्या तोंडावर अघटित घडण्याची शक्यता बळावली आहे.

शिवसेनेतील तो तरुण आमदारांचा मोठा गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचे समजते. कारण शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपला सुद्धा फटका बसणार असल्याने आणि उद्धव ठाकरे जर राजी होणार नसतील तर भाजपने हा दुसरा पर्याय खुला ठेवला आहे. त्यामुळे या असंतुष्ट तरुण आमदारांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये खेचण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत आणि तसे झाल्यास शिवसेनेसाठी तो मोठा राजकीय धक्का असेल यात काहीच शंका नाही.

तसेच शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आणि तरुण आमदारांमध्ये जराही सूत जुळत नसल्याने सगळंच कठीण होऊन बसलं आहे. कारण असंतुष्ठांना जवळ केल्यास वरिष्ठ पक्षापासून दुरावतील आणि त्यापेक्षा सुद्धा भयानक राजकीय पेच निर्माण होईल. त्यामुळे पडण्यामागे सुरु असलेल्या हालचालींचा पत्रकारांना सुद्धा सुगावा लागला असून लवकरच तो मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेला तरुण आमदारांचा गट शिवसेनेला भगदाड पाडण्याची तयारीत असल्याची दबक्या आवाजातील कुजबुज शिवसेनेतील वरिष्ठांमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला लागलेला पक्ष फुटीचा जुना श्राप पुन्हा रंग घेताना दिसणार आहे अशा हालचाली सुरु झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x