27 April 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कृषी कायदे मागे घ्या | अन्यथा.... NDA'चे घटक पक्ष संतापले

RLP threatens, Quit NDA, Farm bills

नवी दिल्ली, १ डिसेंबर: कृषी कायद्यावरून (Agriculture Bills) सध्या देशभर वातावरण तापलं आहे. हरयाणा आणि पंजाबमधून होतं असलेला विरोध सध्या देशभर पसरू लागला असून मोदी सरकार देखील पेचात अडकलं आहे. लाखो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्ली गाठल्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्राने चर्चेची तयारी दाखवली असली तरी त्यापूर्वी गुंता वाढताना दिसत आहे.

कृषी कायद्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा एका नव्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. शिरोमणी अकाली दलानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) काढता पाय घेतल्यानंतर आता आणखी एका पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.

आरएलपीचे संस्थापक आणि नागौरचे खासदार असणाऱ्या हनुमान बेनीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करुन ट्विट केलं. यामध्ये त्यांनी, “अमित शाहजी, देशात सध्या सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता तिन्ही नवीन कायदे मागे घेण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करुन त्यांना योग्य तो मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: RLP founder and Nagaur MP Hanuman Beniwal on Monday tagged Union Home Minister Amit Shah in this regard. In it, he said, “Amit Shahaji, in view of the ongoing agitation in the country against the new agricultural laws, the three new laws should be withdrawn. All the recommendations of the Swaminathan Commission should be implemented. The farmers should be invited to Delhi for discussion as soon as they want and they should be given due respect and their views should be heard, ”he said.

News English Title: RLP threatens to quit NDA over farm bills writes to home minister Amit Shah News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x