14 December 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

राफेलमुळे चीनची खैर नाही? ठराविक माध्यमांकडून का खोटं चित्रं उभं केलं जातंय ? सविस्तर वृत्त

Rafael fighter jet, France, India

नवी दिल्ली, २९ जुलै : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमाने भारताच्या दिशेने झेपावली आहेत.

सोमवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनॅक एअर फोर्स तळावरुन राफेल विमानांनी उड्डाण केले. भारतात दाखल होण्याआधी अल धफ्रा एअर बेसवर एकादिवसासाठी ही विमाने थांबली होती. आज दुपारी राफेल विमाने भारतात दाखल होतील.भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.

२०१६ साली भारताने फ्रान्स सरकारबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यानुसार पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

वास्तविक मागील २-३ दिवसांचा विचार केल्यास प्रसार माध्यमांनी राफेलच्या फ्रांस ते भारत प्रवासाची एकप्रकारे LIVE कॉमेन्ट्रीच सुरु केली आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांनी समाज माध्यमांच्या आडून सुरु केलेला स्वतःच्या पब्लिसिटीचा खेळ असंच म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी याच राफेलच्या सौद्यावरून मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आणि वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि वाद थेट तिथल्या निकालातून संपुष्टात आला. आज त्याच सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश हे संसदेत खासदार देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मुख्य म्हणजे भारतीय वायुदलातील राफेल हे जणू पहिलंच अत्याधुनिक विमान असून ते मोदींच्या राजवटीतच प्राप्त झाल्याचा अघोषित प्रचार काही प्रसार माध्यमं करत आहेत. वास्तविक लष्करासंबंधित हत्यारं ही काळानुसार अपग्रेड होतं असतात आणि तेच जगभरातील लष्करात चालतं. त्यामुळे भारताला देखील तेच लागू होतं. रशियन बनावटीच्या मिग विमानांच्या मालिकांपासून पासून ते रशियाच्या सुखोई ३०K सारख्या अत्याधुनिक विमानांचा ताफा हा यापूर्वीच भारतीय वायुदलात आहे.

वास्तविक जगभरात आज राफेल पेक्षाही अत्याधुनिक लढाऊ विमान आहेत. अगदी फ्रान्सच्या बाबतीतच बोलायचं झाल्यास जग्वार विमानं ही त्याच देशातून भारताला प्राप्त झालेली आहेत. याच मिराज 2000 विमानांनी पाकिस्तान विरोधातील बालाकोट स्ट्राईकमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. पण ती काँग्रेस राजवटीतील असल्याने सत्ताधाऱ्यांसाठी पब्लिसिटीचं माध्यम झाली नसावीत. थोडक्यात एक वास्तव खरं आहे की ती सध्याच्या घडीला राफेल हे भारतीय वायू दलातील सर्वात आधुनिक लढाऊ विमानं आहेत. मात्र त्यामुळे चीन हादरून जाणार आणि चीनचं आता काही खरं नाही अशा कपोकल्पित बातम्या पेरून काही ठराविक माध्यमं आपल्याच जनेतला सत्ताधाऱ्यांच्या आदेशावर अंधारात ठेवत असल्याचं दिसतंय.

 

News English Summary: The first batch of much talked about and much awaited ‘Raphael’ fighter jets will arrive at Ambala Airbase this afternoon. Against this backdrop, tight security has been deployed at a distance of 3 km near Ambala airbase and drones have been banned from flying.

News English Title: Does Rafael fighter jet entry in Indian Air Force is managed through PR management News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x