नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात टायपिंगची चूक सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आम्ही एखाद्या शब्दाची चूक समजू शकतो. परंतु, इथे तर संपूर्ण परिच्छेदतच गडबडी कशी आहे. काही झालं तरी संपूर्ण परिच्छेदातच चूक होणं अशक्य आहे, असा खरगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे खर्गे हे लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष सुद्धा आहेत.

आम्हाला राफेल लढाऊ विमानांच्या कराराप्रकरणी सर्व व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी हवी आहे. जेव्हा संसदेचे सदस्य या विषयीच्या संबंधित सर्व फाईल्स पाहतील, तेव्हाच सदर प्रकरणातील संपूर्ण सत्य उघड होईल, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच बोफोर्स तोफा आणि २-जी प्रकरणात सुद्धा जेपीसी गठीत करण्यात आली होती, याची आठवण सुद्धा त्यांनी मोदी सरकारला करून दिली आहे.

दरम्यान ते या प्रकरणात म्हणाले की, राफेलप्रकरणी मोदी सरकारच्या अहवालात टायपिंगची चूक कशी होऊ शकते ? जर ही चूक एखाद्या शब्दाची असती तर समजू शकलो असतो. पण जर संबंधित संपूर्ण परिच्छेदमध्येच चूक असेल तर ते कसे मान्य करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मोदी सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीबाबत संशय व्यक्त केला आहे.

Congress senior leader kharge criticised modi government over rafael deal at supreme court