27 July 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

ट्रान्सलेटर म्हणाला 'मोदी देश बरबाद करतील' भाजपचा कन्नड अनुवाद चुकला

दवानागिरी : भाजप नेत्यांच्या हिंदीतील भाषणबाजीने कर्नाटक भाजपची सभांमधून चांगलीच फजिती होत आहे. भाजप नेते प्रचारात येऊन मोठं मोठी भाषणं हिंदीत देत आहेत. परंतु कर्नाटकातील जनतेला त्याचा अर्थच कळत नसल्याने पक्षाने ‘ट्रान्सलेटर’ नेमले, परंतु त्यातून अजूनच फजिती होत असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच अमित शहा गडबडीत भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सर्वात भ्रष्ट मुखमंत्री बोलून बसले आणि नंतर सारवासारव केली होती. परंतु एका नामांकित खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार ‘दवानागिरी’ येतील सभेत भलतं-सलतच होऊन बसलय. कारण कानडी जनतेला हिंदी समजत नसल्याने दिल्लीतील नेत्यांची भाषणे व्यर्थ जात होती. भाजप नेते काय बोलत आहेत हेच त्यांना कळत नाही. वरिष्ठांना ते लक्षात आल्याने सभे दरम्यान ट्रान्सलेटर नेमण्याचे ठरले जे नेत्यांची हिंदीतील भाषणे कन्नड भाषेत जनतेला ट्रान्सलेट करून सांगतील.

दवानागिरी येथील सभेदरम्यान बोलताना अमित शहा यांनी सिद्धरमैय्या सरकार टीका करताना म्हणाले की, कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकार कर्नाटकाचा विकास नाही करू शकत. तुम्ही नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन येडियुरप्पा यांना मतं द्या, आम्ही कर्नाटक राज्य नंबर वन बनवून दाखवू. परंतु गोंधळ तेव्हा उडाला जेव्हा धारवाडचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी तेच कन्नडमध्ये ट्रान्सलेट करताना चुकीचं वाक्य बोलून गेले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरीब, दलित आणि मागासलेल्या समाजासाठी काहीच करणार नाहीत, ते देशाला केवळ बरबाद करतील त्यामुळे तुम्ही त्यांना मतं द्या.

हिंदी भाषा आणि त्याच सभेदरम्यानचं ट्रान्सलेशन भाजपची डोकेदुखी बनत चालली आहे. स्थानिकांना हिंदी समजत नाही आणि दिल्लीतील नेत्यांना कन्नड भाषा येत नाही किंव्हा समजतही नाही, त्यामुळे भाजपचा प्रचार होण्याऐवजी भाजपचे नेतेच भाजपचा अपप्रचार करत आहेत की काय असं चित्र तयार झालं आहे. आधीच सिद्धारमैया सरकारने निवडणुकांदरम्यान लिंगायत कार्ड बाहेर काढल्याने भाजपला आधीच घाम फुटला आहे आणि त्यात ही हिंदी कन्नड जनतेच्या डोक्यावरून जाणारी हिंदी भाषणं आणि कहर म्हणजे ट्रान्सलेटर कन्नड मधील अनुवादात पक्षाबद्दलच काही भलतंच वाक्य ट्रान्सलेट करून सांगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच बंगलोर मधील हिंदी भाषण सुद्धा भाषेच्या अडचणीमुळे उपस्थित कानडी जनतेच्या डोक्यावरून गेलं आहे. भाजपने कन्नड ट्रान्सलेशनची जवाबदारी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे आणि खासदार प्रल्हाद जोशी यांच्यावर सोपविली आहे. चित्रदुर्ग मधील अमित शहा यांच्या सभेत अजून एक किस्सा घडला तो म्हणजे त्यांनी अर्ध भाषण करताना कन्नड ट्रान्स्लेटरची मदत घेत केलं आणि अर्ध भाषण हिंदीत केलं. पुढे अमित शहा यांनी उपस्थित कानडी जनतेला हिंदीमध्ये प्रश्न उपस्थित केला तो असा होता की “क्या आप येडियुरप्पा को मुख्यमंत्री बनाना चाहते है ? तेव्हा ते हिंदीत काय विचारात आहेत ते उपस्थित कानडी जनतेला समजलंच नाही आणि त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिल.

गेल्यावेळच्या निवडणुकीत भाजपने ट्रान्सलेशनचे काम एका एजन्सीला दिले होते, परंतु यंदा ती जवाबदारी स्थानिक कानडी नेत्यांना दिले आहे, त्यामुळेच हा गोंधळ उडत असल्याचे जाणकार सांगत आहेत. तसेच हुबळीतील यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रचारादरम्यान सुद्धा ते हिंदीत काय बोलत आहेत तेच उपस्थितांना समजत नव्हते. भाजपची हिंदी भाषेतील भाषणं आणि त्यांच कन्नड ट्रान्सलेशन पाहता सध्यातरी नेत्यांकडून पक्षाचा प्रचार कमी आणि अपप्रचार जास्त होत आहे असेच चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x