25 April 2024 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’, भाजपची दिल्लीत पोश्टरबाजी

नवी दिल्ली : लंडन मधील दौऱ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्षाचा सहभागी नव्हता असा दावा होता. त्याच विषयाला अनुसरून भाजपा आणि पंजाबमधील अकाली दलाने काँग्रेसला डिवचण्याचा प्रकार सुरु केला आहे.

दिल्लीतील शीख दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप करण्यात येत होता. परंतु दिल्लीत भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ अशा शीर्षकाने पोश्टरबाजी सुरु केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पोश्टरबाजी विरोधात एका माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसने दिल्ली पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.

१९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत शीख समाजाविरोधात दंगल उसळली होती आणि त्यात जवळपास ३००० शिखांची हत्या झाली होती. त्याच दंगलीतून शीख समाज आज सुद्धा सावरला नसल्याचे भाजप प्रवक्ते बग्गा यांनी विधान केले होते. काँग्रेस पक्षाकडून याबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परंतु काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात त्या दंगलीचा उल्लेख केला आणि या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. भाजपने मात्र हा मुद्दा उचलून काँग्रेसला पुन्हा कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x