8 December 2021 6:52 PM
अँप डाउनलोड

गुजरात गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता

अहमदाबाद : गुजरातमधील गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने ५ पैकी २ आरोपींना दोषी ठरविले असून इतर तिघांची पुराव्या अभावी सुटका केली आहे. निर्णयाअंती एसआयटी कोर्टाने इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा तर हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दोन वर्षांपूर्वी तपास यंत्रणांनी ६ जणांना गोध्रा हत्याकांडाप्रकरणी अटक केली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप होता. सरकारी वकील जे. एम. पांचाल यांच्या माहितीनुसार, ६ आरोपींमधील कादिर पटालिया याच गेल्या जानेवारी महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं होत. परंतु त्यानंतर बाकीच्या ५ आरोपींवर खटला चालूच होता. संबंधित सर्व आरोपी गोध्रा मधीलच रहिवासी होते.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर कारसेवक असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावण्यात आली होती. त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगल उसळली होती. त्या जाळण्यात आलेल्या डब्यात ५९ प्रवासी होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x